Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीमध्ये कोयता व कुर्‍हाडीने विद्यार्थ्याची हत्या

बारामती ः पुणे जिल्ह्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतांना, तसेच एका आठवड्यात तीनदा गोळीबार करण्याची घटना घडली असतांनाच बारामती येथील उंडवडी सुपेम

जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पतीची हत्या.
राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

बारामती ः पुणे जिल्ह्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतांना, तसेच एका आठवड्यात तीनदा गोळीबार करण्याची घटना घडली असतांनाच बारामती येथील उंडवडी सुपेमध्ये बारामती बसमधून आलेल्या एका तरूणावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुर्‍हाडीने हल्ला करून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महापुरुषाच्या जंयतीवरुन तसेच जुन्या वाडातून ही हत्या करण्यात आल्याचे तपसात उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विनोद भोसले (करखेल, ता. बारामती) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्या हत्येप्रकरणी आरोपी यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा बारामती येथे कॉम्पुटर इंजिनिरींगचे शिक्षण घेत होता. तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता एसटी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरला. यावेळी विनोद वर कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चौघांनी कोयता व कुर्‍हाडीने हल्ला केला. विनोदवर चौघांनी अनामुषपणे वार केले. यात विनोद हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला स्थानिकांनी दवाखान्यात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी केल्यावर धक्कादायक कारण त्यांनी संगितले. गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या वादातून तसेच दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा रागातून त्यांनी विनोदचा खून केल्याचे संगितले. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.

COMMENTS