Homeताज्या बातम्या

अनुकंपा धारकांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया गतिमान करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमाहिती न देणार्‍या व अनुपस्थित कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

बीड : सामान्य प्रशासन विभागाच्या 15 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क पदासाठी अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यान

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी


बीड : सामान्य प्रशासन विभागाच्या 15 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क पदासाठी अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकार्‍यांकडून अनुकंपाधारक उमेदवारांची अद्ययावत प्रतीक्षासूची व रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, अद्यापही काही कार्यालय प्रमुखांनी ही माहिती सादर केलेली नाही. अनुकंपा धारकांना रिक्त पदावर लवकरात लवकर नोकरी देण्याचा माझा मानस आहे. तरी अनुकंपा धारकांना वेळेत नोकरी मिळण्यासाठी प्रक्रिया गतिमान करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात अनुकंपा नियुक्ती प्राधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून रिक्त पदांची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पत्राद्वारे रिक्त पदांची माहिती मागवूनही काही कार्यालय प्रमुखांनी ती अद्यापही सादर केलेली नाही. याबाबत त्यांनी  तिव्र नाराजी व्यक्त करत माहिती सादर न करणार्‍या तसेच बैठकीस अनुपस्थित असणार्‍या कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात यावी, असे आदेश दिले. तसेच ज्या कार्यालयांनी अद्याप माहिती दिलेली नाही, त्यांनी पुढील 10 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 57 उमेदवार अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीत असल्याचे या आढावा बैठकीत समोर आले आहे. अनुकंपा धारकांना वेळेत नोकरी मिळणे अत्यंत गरजेचे असून, संपूर्ण प्रक्रिया कमीत कमी वेळेत आणि नियमानुसार पूर्ण व्हायला हवी, या पायाभूत मुद्द्यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अनुकंपा नियुक्ती प्राधिकारी आढावा बैठकीत विशेष भर दिला.  

COMMENTS