Homeताज्या बातम्या

कल्यामध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचा शुभारंभमहा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या जून 20

कल्याणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेशबंदीवरून शिवसैनिक आक्रमक; पोलिसांचे बॅरिकेड्स झुगारून ‘घंटानाद’ आंदोलन!
कल्याण-टिटवाळ्यात सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
शतकपूर्ती वर्षानिमित्त कल्याणात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे उद्घाटन;  भव्य महारक्तदान शिबिराचेही आयोजन | Tuljapurlive.com


कल्याण : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या जून 2026 च्या नियमित व सुटीच्या तुकडीचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. याचवेळी आयोजित महा रक्तदान शिबिरात 22 विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली.
महापालिका प्रभाग क्रमांक 4-जे विभागीय कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व पर्यावरण विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छता निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाद्वारे मिळणारे ज्ञान समाजहितासाठी वापरावे आणि सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिराला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 22 जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कल्याण विभागीय संचालक मारुती खोडके, विनीत सर, गुप्ता मॅडम, अनिल जाधव, पाटील साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महा रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (पश्‍चिम) येथील अर्पण रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

COMMENTS