बीड: महिला कला महाविद्यालय, बीड येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम श्रद्धा

बीड: महिला कला महाविद्यालय, बीड येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम श्रद्धापूर्वक संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कर्तृत्वपूर्ण सार्वजनिक जीवनाचा आढावा घेतला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान, प्रशासनातील उत्कृष्ट निर्णयक्षमता, लोकाभिमुख कार्यपद्धती, शेतकरी, युवक, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम यांचे विशेष स्मरण करण्यात आले. तसेच, त्यांच्या कार्यातून आजच्या युवक आणि विद्यार्थिनींनी समाजसेवा, विकास आणि जनहिताची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या दिनविशेष समितीकडून या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS