बीड: येथील सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उ

बीड: येथील सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. अरुण भस्मे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल आणि उपप्राचार्य डॉ. गणेश पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, प्रशासनातील कार्यक्षमतेचा आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS