Homeताज्या बातम्या

दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वरची ‘नीट’मध्ये घवघवीत कामगिरी; ५९० गुण मिळवत मिळवले उल्लेखनीय यश

केज: तालुक्यातील विडा परिसरातील मौजे काचरवाडी या अतिशय दुर्गम व डोंगराळ गावातील विद्यार्थी ज्ञानेश्वर दादाराव पडवळे याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिय

नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने काँग्रेसची टीका
आरक्षण वाचवण्यासाठी २६ जूनला चैत्यभूमीवर उपस्थित राहा; उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे अ‍ॅड. तेजस वडमारे यांचे आवाहन
आषाढी एकादशीपूर्वीच पंढरपुरात भाविकांचा महापूर; विठ्ठल दर्शनाची रांग ८ किलोमीटरवर, प्रसादासाठी १२ लाख लाडू सज्ज!

केज: तालुक्यातील विडा परिसरातील मौजे काचरवाडी या अतिशय दुर्गम व डोंगराळ गावातील विद्यार्थी ज्ञानेश्वर दादाराव पडवळे याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या ‘नीट-२०२६’ परीक्षेत ५९० गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे काचरवाडी गावासह संपूर्ण विडा परिसरातून ज्ञानेश्वरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल ईडा शिक्षण संस्था, विडा यांच्या वतीने ज्ञानेश्वरचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव धैर्यशील भाऊ देशमुख, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, केंद्रप्रमुख सुभाष सारुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौरवाडीच्या मुख्याध्यापिका सुनिता बांगर, तसेच दत्तात्रय वरपे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्याला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ज्ञानेश्वरचे वडील दादाराव तुळजीराम पडवळे आणि आई चंद्रकला दादाराव पडवळे हे ऊसतोडणीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी, डोंगराळ परिसरातील मर्यादित सुविधा आणि कठीण परिस्थिती असूनही ज्ञानेश्वरने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काचरवाडी येथेच झालेले आहे.

या यशामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि दर्जा कमी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द याच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. हे यश काचरवाडीसारख्या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले.

COMMENTS