Homeताज्या बातम्या

सौ. के. एस. के. महाविद्यालयात स्व.अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी यांच्य

अंगणवाडी सेविकांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घ्यावेत; खा. श्रीकांत शिंदे यांना शिवसेना महिला आघाडीचे निवेदन
ऑफिसच्या वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; कडक कारवाईची मागणी
अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान

बीड: नवगण शिक्षण संस्था, राजुरी संचलित सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. अजितदादा पवार यांनी विकासाभिमुख विचार, लोकहिताचे निर्णय आणि समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

अजितदादांचे नेतृत्व हे कार्यक्षम प्रशासन, विकासाची दूरदृष्टी आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे होते. युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी केले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळांकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. ए. ए. खान, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. परमेश्वर वाणी, प्रा. डॉ. पी. पी. गायके, प्रा. डॉ. सय्यद इमोनोद्दीन, प्रा. डॉ. इरलापल्ले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. भीमराव मंडलिक यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना फटाले यांनी केले, सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पी. आर. वाणी यांनी मानले. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS