Homeताज्या बातम्या

अखेर ‘सेल्फी विथ रोहित्र-हॅशटॅग अजितदादा’ आंदोलनाला यश; तुळजाई चौकातील धोकादायक रोहित्र स्थलांतरित

बीड: शहरातील नगरनाका ते कृषी कॉलनी, तुळजाई चौक परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी असलेले धोकादायक विद्युत रोहित्र अखेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

सह्याद्री गेस्ट हाऊससह शासकीय बंगल्यांची कामे न करताच कोट्यवधींची बिले काढत भ्रष्टाचाराचा विक्रम; मलबार हिल पीडब्ल्यूडी विभागातील मोठे रॅकेट उघड
ठाणे जमीन गैरव्यवहार
रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

बीड: शहरातील नगरनाका ते कृषी कॉलनी, तुळजाई चौक परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी असलेले धोकादायक विद्युत रोहित्र अखेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि लक्षवेधी आंदोलनाला अखेर यश आले आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत असलेल्या या रोहित्राचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड येथे रेल्वे स्थानक उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी हे रोहित्र केवळ मंडपाच्या कापडाने झाकण्यात आले होते. या गंभीर समस्येकडे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘सेल्फी विथ रोहित्र – हॅशटॅग अजितदादा’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनात युनुस शेख, रामनाथ खोड, अशोक येडे, रामधन जमाले, बाळासाहेब मोरे पाटील, शेख मुस्ताक, शेख मोबीन यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नगर नाका ते कृषी कॉलनी हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे नाट्यगृह, दवाखाने, वाचनालय, शाळा, खासगी क्लासेस आणि बँकेची शाखा असल्याने दररोज हजारो नागरिक व विद्यार्थ्यांची ये-जा असते. मात्र सिमेंट रस्ता तयार झाल्यानंतरही रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत रोहित्र व खांब वाहतुकीस मोठा अडथळा ठरत होते. अखेर प्रशासनाने तुळजाई चौकातील हे रोहित्र सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

शहरातील इतर धोकादायक रोहित्र हटविण्याची मागणी

तुळजाई चौकातील रोहित्र स्थलांतरित झाल्यानंतरही यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, राजीव गांधी चौक, बार्शी नाका, के.एस.के. महाविद्यालय परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी असलेले विद्युत रोहित्र, खांब व दूरसंचार डीपी तातडीने हटविण्याची मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. जमिनीलगत उघड्यावर असलेले रोहित्र, फ्यूज बॉक्स सुरक्षित उंचीवर बसवून संरक्षक उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

COMMENTS