Homeताज्या बातम्यादेश

सुधा मूर्तीं यांची राज्यसभेवर निवड

नवी दिल्ली ः ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर

Ahmednagar : सेप्टिक टँकमध्ये पडून घर मालकासह दोघांचा मृत्यू | LOKNews24
एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही

नवी दिल्ली ः ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचं अभिंदन केले आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन केल्याने मला आनंद होत आहे. राज्यसभेत जी. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या ’नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सामर्थ्याचे उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सुधा मुर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या एक यशस्वी उद्योजिका, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत.

COMMENTS