Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वाभिमान दिन साजरा

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन-सुनिल जगताप

अंबाजोगाई प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहर व परिसरात स्वाभिमान दिन उत्साहात दि

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येणार ?
6 लग्न करून फसवणूक
ममतांच्या विरोधात उमेदवार दिल्यास भाजपचेच पैसे वाया जातील… तृणमूलचा इशारा

अंबाजोगाई प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहर व परिसरात स्वाभिमान दिन उत्साहात दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप यांनी दिली.
स्वाभिमान दिनानिमित्त मंगळवार, दि. 13 जून रोजी शहरातून 55 मोटार सायकलची रॅली विजयी घोषणा व महामानवांचा जयघोष करीत काढण्यात आली. ही रॅली संत भगवानबाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक ते दवाखाना मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आणि बस स्टँड समोरील हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसाचे पठण करून बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मनसेकडून सर्व प्रमुख चौकांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महामानवांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप, शहराध्यक्ष गणेश बरदाळे, तालुका उपाध्यक्ष रमेश आडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश काळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नितीन परदेशी या प्रमुख पदाधिकार्यांसह नितेश शिराळे, श्री.कुलकर्णी, अमोद कुलकर्णी, सचिन बनसोडे, तन्मय कुलकर्णी, पवन माने, रामभाऊ किर्दंत (सातेफळ), व्यंकटेश देशमुख, अनिकेत जगताप, आमेर पठाण, राजेश कोकाटे, विशाल सोनटक्के, सचिन सुरवसे, सोनेराव गव्हाणे, पवन भिसे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.  स्वाभिमान दिनानिमित्त मनसेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 26 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. सध्या रक्तपेढीत मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा आहे. अशावेळी मनसेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरामुळे गरजू रूग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या शिबीराच्या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप, शहराध्यक्ष गणेश बरदाळे, तालुका उपाध्यक्ष रमेश आडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश काळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नितीन परदेशी, श्री.कुलकर्णी, राजेभाऊ यशवंत, विलास शिंदे, सचिन बनसोडे, तन्मय कुलकर्णी, चेतन मगर, पवन माने, रामभाऊ किर्दंत (सातेफळ), व्यंकटेश देशमुख, ओमकार चाटे, संघर्ष गायसमुद्रे, अनिल जगताप, पवन भिसे आदींसह कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेतला. या प्रसंगी स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, अधिक्षक डॉ.राकेश जाधव, रक्तपेढी विभागप्रमुख डॉ.बगाटे, डॉ.विनय नाळपे, पाखरे आदींची उपस्थिती होती. तसेच स्वाभिमान दिनानिमित्ताने 55 वृक्षरोपांची लागवड करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप यांनी दिली आहे.

COMMENTS