Homeताज्या बातम्या

परळी पंचायत समिती कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन! विकास व जनसेवेतील योगदान सदैव प्रेरणादायी: राजवर्धन भोसले

परळी वै.: स्व. अजितदादा पवार यांचे प्रशासनावरील प्रभुत्व, विकासाभिमुख निर्णयक्षमता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची कार्यशैली ही सदैव प्र

विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार! पुणे, मराठवाडा व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तख्त श्री हजूर साहिबकडून विशेष सत्कार

परळी वै.: स्व. अजितदादा पवार यांचे प्रशासनावरील प्रभुत्व, विकासाभिमुख निर्णयक्षमता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची कार्यशैली ही सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन परळी वैजनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले यांनी केले.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ पंचायत समिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रशासन, अर्थकारण, कृषी, ग्रामीण विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली. प्रशासनावर असलेली त्यांची भक्कम पकड, कामकाजातील शिस्त, विकासाभिमुख निर्णयक्षमता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची कार्यशैली यामुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.

राज्याच्या विकासासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारे आणि विकासकामांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे नेतृत्व म्हणून स्व. अजितदादा पवार यांची ओळख होती. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देताना स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याची प्रभावी कार्यपद्धती दिसून आली.

महाराष्ट्र शासनाने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा शासकीय अधिकृत कार्यक्रमांमध्ये समावेश केल्याने त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव झाला आहे. राज्यभरातील शैक्षणिक तसेच शासकीय संस्थांमध्ये त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय भावी पिढीला व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जनसेवा, विकास आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे यांच्यासह पंचायत समिती कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS