Homeताज्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस

नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २६ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णाल

बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू
पागोरी पिंपळगावातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण
लेखी आश्वासनानंतर कोरेगव्हाणकरांचे उपोषण स्थगित
Sonam Wangchuk Says Will End Fast If Centre Spares Students From Legal  Action

नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २६ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून, आता त्यांनी सरकारला पत्र लिहून सशर्त उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

सरकारने हमी दिली तरच उपोषण थांबवणार

NEET पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते, तिथून पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांनी सरकारला पत्र पाठवून आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही आणि त्यांच्यावर दंड ठोठावला जाणार नाही, अशी लिखित हमी सरकारने दिल्यास उपोषण मागे घेईन, अन्यथा उपोषण सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या:

  • आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळावी.
  • संसदेत चर्चा करून या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
  • शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा.
  • आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई होऊ नये.

अवयवांवर विपरीत परिणाम होण्याचा डॉक्टरांचा इशारा

मेदांता रुग्णालयाचे डॉ. नितीन दिघे यांनी वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. २५ दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर (Organs) गंभीर व विपरीत परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली असून, आता सरकार यावर लवकरच सकारात्मक मार्ग काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS