Homeताज्या बातम्या

आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते

शेवगाव: दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या कथित कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांच्या घटन

नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
नागापूर (खुर्द) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता व विधी सेवा शिबिर संपन्न

शेवगाव: दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या कथित कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे तात्काळ संरक्षण करण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सतीश मोहिते यांनी भारताच्या राष्ट्रपतींना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.

या निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, कलम १९(१)(ब) अंतर्गत शांततापूर्ण व नि:शस्त्रपणे एकत्र येण्याचा अधिकार आणि कलम २१ अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या युवकांवर अनावश्यक बळाचा वापर झाला असल्यास त्याची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना सोमनाथ सतीश मोहिते म्हणाले की, “लोकशाही व्यवस्थेमध्ये देशातील युवकांना शांततेच्या मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या रास्त आवाजाला दडपण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधून न्याय देणे अत्यंत आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण होणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.”

COMMENTS