Homeताज्या बातम्या

पदाधिकाऱ्यांच्या फौज कागदावरच? भाजपच्या आंदोलनात रिकामे पडले मैदान; संघटनात्मक ताकदीवरच प्रश्नचिन्ह

नांदेड: दिल्लीतील घडामोडींच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने नवा मोंढा येथील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. म

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नाट्यशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक इनकर व अभिषेक घुले प्रथम; के.एस.के. महाविद्यालयाचे यश
खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!
Nanded After the entry of ED in Nanded Municipal Corporation officials fled to Mumbai | Nanded: नांदेड महापालिकेत ईडीची एन्ट्री झाल्याने अधिकाऱ्यांचा मुंबईकडे पळ, अधिकारी ...

नांदेड: दिल्लीतील घडामोडींच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने नवा मोंढा येथील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाने काँग्रेसपेक्षा भाजपच्याच स्थानिक संघटनात्मक ताकदीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेत तब्बल ४५ नगरसेवकांचे प्रतिनिधित्व असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाच्या आंदोलनात प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक दिसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पक्षाकडे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ अध्यक्ष, पन्ना प्रमुख, एसआयआर संयोजक, विविध आघाड्या व प्रकोष्ठांचे अध्यक्ष, संयोजक, सहसंयोजक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांची मोठी फौज असल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष आंदोलनात केवळ १५ ते २० कार्यकर्ते आणि काही मोजकेच पदाधिकारी उपस्थित असल्याने या संघटनात्मक दाव्यांची हवा निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. पक्षाचे नियमित आंदोलन, निवेदने किंवा जनांदोलनांमध्येही अनेक नगरसेवक क्वचितच दिसतात, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्येही दबक्या आवाजात सुरू आहे. कार्यकर्त्यांनी राबविलेल्या मेहनतीवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षाच्या रस्त्यावरील संघर्षात मात्र अनुपस्थित राहतात, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे राज्यस्तरीय, विभागीय किंवा जिल्हास्तरीय अनेक स्वयंघोषित नेतेही अशा आंदोलनांपासून दूर राहतात. पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांमध्येही वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती वारंवार दिसून येत असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असल्याचे बोलले जात आहे. अनेक आमदारही स्थानिक आंदोलनांपासून दूर राहत असल्याने संघटनात्मक समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, निवडणुकीच्या काळात पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या-मोठ्या याद्या प्रसिद्ध होतात; मात्र प्रत्यक्ष जनांदोलनात त्या यादीतील बहुसंख्या चेहरे दिसत नाहीत. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद कागदावर आहे की प्रत्यक्ष मैदानात, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा, विधानसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती भाजपसाठी इशारा मानली जात आहे. केवळ पदांची घोषणा करून संघटना मजबूत होत नाही; तर रस्त्यावर उतरून पक्षाची भूमिका मांडणारे सक्रिय कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीच पक्षाची खरी ताकद असतात. नांदेडमधील अलीकडील आंदोलनाने नेमका हाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या आंदोलनाच्या वेळी भाजपच्या नेत्यांनी वापरलेली भाषा व आक्रमक स्टाईल संघ परिवारातील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांना रुचलेली दिसून येत नाही. याबद्दलची उघड-उघड नाराजी समाज माध्यमातून काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्यामुळे वेगळी चर्चा होत आहे. काही पदाधिकारी महापालिकेत आगामी नव्या वाटणीमध्ये महत्त्वाचे पद पदरात पाडून घ्यावे किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी आक्रमक आंदोलने करत असल्याचीही चर्चा होत आहे.

COMMENTS