Homeताज्या बातम्या

विद्यार्थी प्रश्नासाठी माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे रस्त्यावर; गेवराई तहसीलदारांना दिले निवेदन

गेवराई: दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी देखील

मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची एजी कार्यालयामार्फत होणार राज्यस्तरीय चौकशी; विशेष टास्क फोर्स स्थापन होणार
’बेटी बचाव…’चे नारे हवेत, पार्डी-बोधडी जि.प. शाळेला मात्र कुलूप ठोकण्याची वेळ; शिक्षणाधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाचा जाहीर पंचनामा!
घरकुल अनुदानावर डाका; १५-२० हजारांच्या लाचखोरीने किनवट पंचायत समिती पोखरली!

गेवराई: दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका गेवराई तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना मांडली.

दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराईचे माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे हे वयाच्या ८४ व्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज गेवराई तहसीलदारांना निवेदनाद्वारे देशातील विविध परीक्षांचे पेपर फुटी प्रकरण असो, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या असोत किंवा आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज असो, या सर्वांचा तीव्र निषेध नोंदवला.

शासनाने वेळीच योग्य पावले उचलून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राज्यभरात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा डॉ. मुंडे यांनी दिला.

याशिवाय, गेवराई तालुक्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल, या मागणीचे निवेदनही माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी तहसीलदारांना सुपूर्द केले.

COMMENTS