Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनाथ गायींची शाळा वीरगावची गोधाम गोशाळा

अकोले ः सध्या कडक उन्हाळा व त्यामध्ये तीव्र चारा टंचाई, पाणीटंचाई असतांना गोधाम गोशाळा वीरगाव येथे 350 देशी गायींचे संगोपन कोणत्याही सरकारी अनुदा

LOK News 24 I दखल ; तीन विचारधारेचे सरकार टिकणार ?
पागोरी पिंपळगावातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण
अक्षदा मंगल कलशाचे राजूरमध्ये स्वागत

अकोले ः सध्या कडक उन्हाळा व त्यामध्ये तीव्र चारा टंचाई, पाणीटंचाई असतांना गोधाम गोशाळा वीरगाव येथे 350 देशी गायींचे संगोपन कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केले जाते. 2015 साली वीरगाव गर्दनी रोड येथे ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोधाम गोशाळेची स्थापना करण्यात आली. 10 गायीपासून सुरुवात करून आज मितीला 350 देशी गायींचे संगोपन केले जाते. कत्तलीसाठी जाणार्‍या गाई सोडवून त्यांचा सांभाळ केला जातो. शेणखत विक्री व दानशूरांकडून होणारी मदत हे या गोशाळेचे उत्पन्नाचे साधन आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार गोसेवा ही सर्वोत्तम सेवा मानली जाते.
अकोले, संगमनेर, राजूर, मुंबई, पुणे येथील काही दानशूर व्यक्ती व संस्था मदत करतात. वाढदिवस, लग्न वाढदिवस, काही सामाजिक धार्मिक कार्यक्रम यातून रोख किंवा चारा स्वरूपात मदत प्राप्त होते. सध्या दुष्काळ परिस्थितीमध्ये उत्पन्न व खर्च यामध्ये खूप तफावत येते. अशा कठीण परिस्थितीमध्ये संतोष कदम शास्त्रीजी व प्रमिलाताई ढगे अतिशय जिद्दीने, कष्टाने गोशाळा सांभाळतात. ओला व सुखा चारा मिळून रोज 5 टन चारा लागतो. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे प्रती जनावर प्रतिदिन 50 रु अनुदान मिळते, मात्र महाराष्ट्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. समाजातील गोप्रेमी, दानशूर व्यक्तींनी गोमातेच्या संगोपनासाठी यथाशक्ती मदत केल्यास गो सेवेचे पूण्य त्यांच्या पदरी पडणार आहे. तसेच गोशाळेस दान देणार्‍या दानदात्यांना 80 जी अंतर्गत कर सवलत मिळणार आहे. 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी या गो शाळेचा 9 वा वर्धापन दिन व गोपाल कृष्ण मंदिराचा 2 रा वर्धापन दिन व स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळ्यानिमित्त गोशाळा येथे स्वामी याग, स्वामींचा पालखी सोहळा या कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी 6 ते भाविकांच्या आगमनापर्यंत केलेले आहे .सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संतोष कदम शास्त्री, प्रमिला ढगे, सतीश बुब, रामनिवास राठी आदिसह अनेक गो प्रेमी मान्यवरांनी केली आहे.

COMMENTS