किनवट : मातंग समाज संघटनेची पुनर्बांधणी करणे आणि अनुसूचित जाती (डउ) उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी आज गोकुंदा येथील
किनवट : मातंग समाज संघटनेची पुनर्बांधणी करणे आणि अनुसूचित जाती (डउ) उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी आज गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात मातंग समाजाची एक व्यापक बैठक पार पडली. समाजाचे ज्येष्ठ नेते मारोतराव सुंकलवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर घणाघाती चर्चा झाली. तसेच आगामी 26 जुलै 2026 रोजी मातंग समाज संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले. बैठकीची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
बैठकीत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते मारोतराव सुंकलवाड यांनी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले:मातंग समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र सवलतींचे धोरण राबवणे गरजेचे आहे. जर शासन स्तरावर आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर आपल्याला आपसातील मतभेद बाजूला सारून संघटित व्हावे लागेल. आपला लढा कोणाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नसून, संविधानाने दिलेले हक्क मिळवण्यासाठी आहे. मातंग समाजाची सद्यस्थिती पाहता उपवर्गीकरणाद्वारे स्वतंत्र आरक्षण मिळणे ही आता काळाची गरज बनली आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आडेलू बोनगीर, तुकाराम मासीदवार आणि शेकना गुंडावार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत हक्कांच्या लढ्यासाठी समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक: राज माहूरकर यांनी केले. सूत्रसंचालन: जनार्धन काळे यांनी सांभाळले तर आभार प्रदर्शन: मारोती गायकवाड यांनी केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, सुरेश घुम्मडवार, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, सुरेश साकपेल्लीवार, संतोष माहूरकर, अजय जागरलावार, नरेश माहूरकर, बालाजी बटूर, रवि उप्पलवार, गंगाधर नूतनीपेल्लीवार, किशोर बोलेनवार, लिंगन्ना कोत्तूरवार, डी. एम. बटूर, मारोती गायकवाड, बालाजी गायकवाड, तिरुपती मोक्कीनवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे मातंग नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष 26 जुलै रोजी घोषित होणार्या नवीन तालुका कार्यकारिणीकडे लागले असून, या नव्या फळीच्या माध्यमातून आंदोलनाला गती दिली जाणार आहे.

COMMENTS