Homeताज्या बातम्या

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला नायगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा; तहसील कार्यालयासमोर निदर्शने

नायगाव : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषणास बसलेल्या समाजसेवक व शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या

छत्तीसगडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेची सदस्य म्हणून शपथ
आज उपोषण सोडणार, जर..."; सोनम वांगचूक यांनी ठेवल्या ३ अटी, मोर्चात सहभागी होण्यावर सस्पेन्स - Marathi News | "I will end my hunger strike today, if..."; Sonam Wangchuk sets 3 ...


नायगाव : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषणास बसलेल्या समाजसेवक व शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) नायगाव तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा प्रणाली लागू करावी, पोलिस भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अन्यायाची चौकशी करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्याही निवेदनात करण्यात आल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, बालाजी धुमाळ, आनंद कांबळे, नारायण पांचाळ, रावसाहेब वाघमारे, साईनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

COMMENTS