अर्धापूर तालुक्यातील लोणारी नदीच्या पुलावर साहेबराव केरबा लोणे (वय 55 वर्ष) रा.लोणी खु. यांना लहान कडून भरधाव क्रेनने जोरदार धडक दिल्याने हे जा

अर्धापूर तालुक्यातील लोणारी नदीच्या पुलावर साहेबराव केरबा लोणे (वय 55 वर्ष) रा.लोणी खु. यांना लहान कडून भरधाव क्रेनने जोरदार धडक दिल्याने हे जागीच ठार झाले हा अपघात दि.19 रविवारी रोजी दुपारी घडला आहे.
साहेबराव केरबा लोणे हे लोणी खुर्द कडे येत असताना लहान कडून येणार्या क्रेनने लोणारी नदीच्या पुलावर जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरक्षक महादेव मांजरमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले,जमादार विजय आडे,हेमंत बिचकेवाड यांना घटनास्थळी पाठवून अपघातात मृत्यू झालेले साहेबराव लोणे यांना महामार्ग पोलीस कर्मचारी व सेवक वसंत सिनगारे यांच्या मदतीने महामार्गाच्या रुग्ण वाहिकेतुन ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले.अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS