Homeताज्या बातम्या

मुंबई-नांदेड’ अंतर आणखी जवळ? वंदे भारतचा प्रवास सव्वासात तासांवर आणण्याची जोरदार मागणी

मुंबई आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा सध्या

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण
समृद्धी महामार्गावर ट्रकच्या धडकेत 7 कामगारांचा मृत्यू; जालन्याजवळील घटना, 3 जण गंभीर जखमी
प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ



मुंबई आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा सध्याचा प्रवासकाल आणखी कमी करून अवघ्या सव्वासात तासांत (7 तास 15 मिनिटे) नांदेड गाठता यावे, यासाठी रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी मागणी पुढे रेटली आहे.
काही महिन्यांपूर्वीच मुंबई-नांदेड वंदे भारतच्या वेळापत्रकात सुमारे 30 मिनिटांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे मार्गावरील ट्रॅक सुधारणा, सिग्नल यंत्रणा आणि कवच सुरक्षा प्रणालीच्या कामांमुळे या मार्गावर अधिक वेगाने गाड्या चालविणे शक्य असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. अनावश्यक ’स्लॅक टाइम’ कमी केल्यास गाडीचा एकूण प्रवासकाल आणखी कमी होऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे. नांदेड-मनमाड-नाशिक-इगतपुरी हा मोठ्या प्रमाणावर सपाट रेल्वेमार्ग असल्याने गाडीचा वेग टिकवून ठेवण्यास फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रवास सुमारे दोन तासांनी कमी होण्याची क्षमता असल्याचे रेल्वे क्षेत्रातील जाणकार सांगतात. प्रवासकाल कमी झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील नागरिकांना होणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली आणि परिसरातील प्रवाशांना मुंबईतील शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि उद्योग क्षेत्राशी अधिक जलद संपर्क साधता येईल. तसेच मुंबई परिसरातील भाविकांना नांदेड येथील गुरुद्वारा तसेच माहूरसारख्या धार्मिक स्थळांना कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. याशिवाय, छत्रपती संभाजीनगरपर्यंत स्वतंत्र वंदे भारत चालविण्याची आवश्यकता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेडपर्यंत धावणार्‍या वेगवान वंदे भारतमुळे संपूर्ण मराठवाड्याला त्याचा लाभ मिळू शकतो. परिणामी देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताणही काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा तांत्रिक व व्यावहारिक दृष्टीने अभ्यास करून वेळापत्रकात आवश्यक बदल केल्यास मराठवाड्याच्या संपर्क व्यवस्थेला नवे बळ मिळू शकते. वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा रेल्वे प्रवास हा आता प्रवाशांच्या प्रमुख अपेक्षांपैकी एक बनला आहे.

COMMENTS