Homeताज्या बातम्या

श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी म्हसे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव सुनीलरा

खा. वाकचौरेंच्या नेतृत्वात १०० शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला शिर्डीत मोठे खिंडार
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी म्हसे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव सुनीलराव भोर, सचिवपदी मधुकर सुपेकर तर उपाध्यक्षपदी घोटवी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास जंजीरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था, श्रीगोंदा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश निभोंरे, व्हा.चेअरमन बाळासाहेब भोर तसेच संचालक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना चेअरमन प्रकाश निभोंरे म्हणाले की, मुख्याध्यापक संघटना ही शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संघटना असून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघटनेने प्रभावीपणे कार्य करावे. बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये मुख्याध्यापकांची भूमिका अधिक जबाबदारीची असून संघटनेच्या माध्यमातून शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांसाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवनियुक्त अध्यक्ष सुनील भोर यांनी सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. संघटनेच्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि संघटनात्मक प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी शिवाजीराव नागवडे विद्यालय वांगदरीचे मुख्याध्यापक रविंद्र भोंडवे, मेजर भिमराव उलहारे, उज्वला उलहारे यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS