Homeताज्या बातम्या

अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षांवरील ‘अविश्वास’ मंजूर 

अकोले :   नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. पीठासीन अधिकारी तथा संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण उंडे यांनी १७ पैकी १२ म्हणजेच दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे हा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.या सभेला नगराध्यक्ष वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, पाणीपुरवठा समिती सभापती शीतल अमोल वैद्य, बांधकाम समिती सभापती वैष्णवी सोमेश्वर तथा बबलू धुमाळ आणि काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीप नाईकवाडी हे पाच सदस्य अनुपस्थित होते.या निकालामुळे माजी आमदार वैभवराव पिचड आणि बाळासाहेब वडजे यांना भाजपअंतर्गत कुरघोडीचा मोठा फटका बसला आहे. मागील तीन महिन्यांपासून नगरपंचायतीमध्ये भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होता. नाराज नगरसेवकांच्या मागणीची पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्याने आणि वडजे यांनी राजीनामा न दिल्याने, भाजपच्या १२ पैकी ९ सदस्यांनी त्यांची शहर आघाडीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्या जागी तमन्ना मोसीन शेख यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी आणि अन्य सदस्यांनी २० मे रोजी वडजे व उपनगराध्यक्ष नवले यांना हटवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.अविश्वास ठरावाच्या निमित्ताने भाजपचे बंडखोर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचे नगरसेवक एकत्र आले आहेत. दरम्यान,भाजपचे आठ बंडखोर आणि शिवसेना उबाठा गटाचे दोन असे दहा सदस्य लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ही राजकीय आघाडी केवळ सत्तेपुरती आहे की यातून नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांपूर्वी भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती, मात्र आता नगरपंचायतीत नवीन फेरबदल पाहायला मिळत आहेत.नगरपंचायतमधील संख्याबळ नगरपंचायतीत सध्या भाजप १२, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) दोन आणि काँग्रेसचा एक असे १७ सदस्य आहेत.

नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये पोलिसांचा रूट मार्च
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव | LokNews24
कर्जतच्या राजकारणात अतिक्रमणावरून महासंग्राम गरिबांचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही; नगराध्यक्षा रोहिणी गुंड सभापती राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आमनेसामने
Build gutters on Shahapur-Gevrai road before monsoon, demand of Mayor  Sonali Naikwadi | Marathi News

COMMENTS