Homeताज्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली / प्रतिनिधी : गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले

ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगितडॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव,  रक्त तपासणी.. - Marathi News | Sonam Wangchuk wife Geetanjali Angmo has  filed petition in the High Court and ...

नवी दिल्ली / प्रतिनिधी : गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे.नवी दिल्ली : गेल्या 3 आठवड्यांपासून बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय योग्य होता, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.उपचारांबद्दलचे सगळे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांचे पथक सोनम वांगचुक यांच्या सहमतीने घेतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार सुरू राहतील आणि एम्सचे डॉक्टरदेखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि रुग्णालय यांच्याकडून उच्च न्यायालयाने 3 दिवसांत अहवाल मागवला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जुलैला होणार आहे.शरीराची वैद्यकीय स्थिती प्रत्येक वेळी सारखी नसते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाला संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवावे लागते. वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय गरज पाहता हा निर्णय योग्य होता, असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले. सोनम वांगचुक कोणत्याही प्रकारच्या अटकेत नाहीत. त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात त्यांना जाऊन भेटण्याची परवानगी आहे. उपचारांच्या दरम्यान पुढे घेतले जाणारे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांच्या सहमतीने घेतले जातील, ही बाब न्यायालयाने स्पष्ट केली.सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिब्बल यांनी केली. वांगचुक यांना त्यांच्या डॉक्टरांना आणि वकिलांना पूर्णपणे भेटायला मिळत नाही. रुग्णाला त्याच्या गरजेनुसार, इच्छेनुसार त्याच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकार आहे. खासगी रुग्णालय रुग्णवाहिका पाठवण्यास तयार आहे. त्यांची मागणी केवळ उपचारांसाठी तिथे शिफ्ट होण्याची आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

COMMENTS