शेतकर्यांनी कर्जमाफीची लढाई जिंकली आहे तरीही शेतकर्यांच्या हक्काचा हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा देऊ असे घोषणे केले असताना सरकारने व पिक विमा

शेतकर्यांनी कर्जमाफीची लढाई जिंकली आहे तरीही शेतकर्यांच्या हक्काचा हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा देऊ असे घोषणे केले असताना सरकारने व पिक विमा कंपन्यांनी शेतकर्याला फसवण्याचे काम केलं आहे. सरकार व पिक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड पिंपळनेर रोडवरील उमरी फाटा (उमरद खालसा फाटा)पेट्रोल पंपा या ठिकाणी भव्य शेतकरी रस्ता रोको आंदोलन दिनांक 14 जुलै मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केले आहे.
तरी शेतकरी पिक विमा करिता आक्रमक झालेले दिसत आहेत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गावोगावी बैठका घेऊन पिक विमा करिता शेतकर्यास जनजागृती करण्यात येत आहे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने भाटसांगवी, राक्षसभुवन, बर्हाणपूर ,कुकडगाव,नागापूर खुर्द ,वडगाव गुंडा, ईट या ठिकाणी शेतकरी बैठका घेण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त संख्येने शेतकर्यांना उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आले या वेळी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सरपंच गोरख डोईफोडे, उपसरपंच अरुण बोगाने, सरपंच राजेंद्र गाडे, दीपक जाधव, राजेंद्र कुटे महाराज, वाणी अण्णा,खाजभाई पठाण, कमलेश बोराडे, दिलीप चादर, राहुल साळुंके, चेअरमन रोहिदास मस्के, उमेश मस्के,

COMMENTS