Homeताज्या बातम्या

शासकीय कर्करोग रूग्णालयात 108 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयाने स्त्रीरोग कर्करोगावरील उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रुग

आदित्य महाविद्यालयात रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेचे मूल्यमापन कार्यशाळाविद्यार्थ्यांच्या क्लीनिकल व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी 6 तास विशेष प्रशिक्षण.
ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आयोजनविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव
शासकीय कर्करोग रुग्णालयात 108 रोबेटिक सर्जरी


छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयाने स्त्रीरोग कर्करोगावरील उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रुग्णालयात वर्षभरात 108 रोबोटिक शस्त्रक्रिया ा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने आयोजित विशेष गौरव सोहळ्यात कॅनडातील आरोग्यतज्ज्ञ डॉ. फ्रँक ओटिंगर यांनी रुग्णालयातील सुविधा, उपचारपद्धती आणि वैद्यकीय सेवेचे मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. ओटिंगर म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली आहे, ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. रुग्णालयाचा परिसर, वैद्यकीय सुविधा आणि उपचारांची गुणवत्ता पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी नमूद केले. रोबोटिक शस्त्रक्रियांच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात रुग्णालयाच्या मोफत उपचार व्यवस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि कुशल वैद्यकीय पथकाचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले. अशा प्रकारच्या सुविधा सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देणे हे आरोग्य व्यवस्थेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी या यशाबद्दल संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करत आगामी योजनांची माहिती दिली. पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक आण्विक तपासणी प्रयोगशाळा आणि आधुनिक रक्तपेढी कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार अधिक वेगाने व अचूकपणे करता येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सध्या सुरू असलेल्या सहा अतिविशेषज्ञ वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच प्रतिबंधात्मक कर्करोगशास्त्र आणि वेदनाशामक तसेच जीवनाच्या अंतिम टप्प्यातील रुग्णसेवा या दोन नव्या अभ्यासक्रमांचीही लवकरच भर घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे वैद्यकीय शिक्षणासोबतच संशोधनालाही चालना मिळणार आहे.

COMMENTS