राहाता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील शिवसेना हेल्पलाइन कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून गरजू, निराधार, विधवा महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर गरीब व गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमाचे राज्यस्तरीय समन्वय मंगेश चिवटे यांच्याकडे आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत असून, मागील चार वर्षांत जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाच्या माध्यमातून सुमारे १२ कोटी रुपयांची मदत मिळाल्याचा दावा करण्यात आला. जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांच्या पुढाकारातून रुग्णसेवेबरोबरच निराधार, गरीब व गरजू नागरिकांना अधिक प्रभावी मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना हेल्पलाइन कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कक्षाच्या फलकाचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी खा. सदाशिव लोखंडे, आ.अमोल खताळ, आ.विठ्ठलराव लंघे, शिवसेना सचिव राम रेपाळे, प्रवक्ते संजीव भोर, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. भानुदास मुरकुटे, सुजित झावरे, धनंजय जाधव, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, सुनीता शेळके, प्रदीप राज भोंडे, रणजीत परदेशी, धनंजय गाडे, विक्रम राठोड, सागर बोथे, प्रकाश चित्ते, राजेंद्र झावरे, मीनाक्षी वाघचौरे, अर्चना निबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS