नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णुपुरी समोरील पुलाचा भाग दिनांक 9 जून रोजी कोसळल्याची घट

नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णुपुरी समोरील पुलाचा भाग दिनांक 9 जून रोजी कोसळल्याची घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी, नांदेड व पोलिस अधीक्षक, नांदेड यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग यांनाही पाठविण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम, निष्काळजीपणा अथवा अन्य कोणतीही अनियमितता झाली आहे का याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदार, अभियंते व जबाबदार अधिकार्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित पुलाची व परिसरातील इतर संरचनांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी दिला आहे.

COMMENTS