Homeताज्या बातम्या

चिचोंडी पाटील येथे एसटी बस स्थानक उभारण्याची मागणीपशुवैद्यकीय रुग्णालय इतरत्र हलविण्याचा प्रस्ताव

बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) राज्यमार्गावरील चिचोंडी पाटील येथे नवीन एसटी बस स्थानक उभारण्यात यावे तसेच सध्या असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय गावातील अन्

कान्हेगावच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वाळूंज  
पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले



बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) राज्यमार्गावरील चिचोंडी पाटील येथे नवीन एसटी बस स्थानक उभारण्यात यावे तसेच सध्या असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय गावातील अन्य जागी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, संबंधित लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे बीड जिल्हाधिकार्‍यांमार्फत सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान चिचोंडी पाटील येथील पूर्वीचे बसस्थानक हटविण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात कोणत्याही प्रकारच्या निवार्‍याविना रस्त्याच्या कडेला उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. गावाची लोकसंख्या वाढली असून नागरिकांना बीड, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, धाराशिव, सोलापूर आणि लातूर आदी ठिकाणी नियमित प्रवास करावा लागतो. त्यामुळे चिचोंडी पाटील येथे सुसज्ज एसटी बस स्थानकाची गरज अधिक तीव्र झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एस. एम. युसूफ आणि रमेशराव गंगाधरे यांनी सुचविल्यानुसार, पूर्वीचे शासकीय ग्रामीण रुग्णालय असलेल्या जागेवर बस स्थानक उभारता येऊ शकते. सध्या त्या ठिकाणी सुरू असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय गावातील अन्य योग्य जागी स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, या ठिकाणी बस स्थानक उभारल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्याबरोबरच गावातील सुशिक्षित युवकांना लघुउद्योग व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. या मागणीचा सकारात्मक विचार करून चिचोंडी पाटील येथे लवकरात लवकर एसटी बस स्थानक उभारण्याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

COMMENTS