Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळात सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

इगतपुरीतील गरोदर मातेच्या मृत्यूप्रकरणी काँगे्रस आक्रमक

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शेतकरी प्रश्‍न आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका गरोदर मातेचा मृत्यूप्र

मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज भाविकांना दर्शनास खुले
पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शेतकरी प्रश्‍न आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका गरोदर मातेचा मृत्यूप्रकरणी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले. इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेच्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत आला असता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले वर्षा गायकवाड यांनीही आक्रमकपणे तातडीने या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. विरोधक आक्रमक झाल्याचं पाहून देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर परखड भूमिका मांडत, विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला.

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. इगतपुरीच्या सोनेवाडी गावात आदिवासी गरोदर महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यातून ती इगतपुरीच्या दवाखान्यात पोहोचली असता तिथे डॉक्टरच नसल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा ती गरोदर महिला वाडीवरे गावात गेली. तिथे तिची प्रकृती इतकी बिघडली की तिचा मृत्यू झाला. आपल्या प्रगत राज्यात एक आदिवासी महिला फक्त उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडते ही अवस्था आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची टीका नाना पटोलेंनी केली. त्यांना आदिवासी म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेची एक प्रकारे हत्याच शासकीय असंवेदनशीलतेमुळे झाली आहे. याला शासन जबाबदार आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा घडवावी ही आमची मागणी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. हे आपल्याला भूषणावह नाही, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. अधिवेशन सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही काँग्रेसने सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा सवाल आम्ही केला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देताहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज जनता उतरवणार, असे नाना पटोले म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यावर नाना पटोले यांनी सहमती दर्शवली. बरोबर आहे. हे भाजपवाले टोलनाके मुक्त महाराष्ट्र करू असे ओरडत होते. आता काय झाले? किती टोलपासून सुटका झाली? ही टोल पार्टी आहे. समृद्धी महामार्गावर निर्दोष लोकांची हत्या करताहेत, असा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील घटनेवरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले. 75 वर्षे पूर्ण झाली पण कधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. मणिपूर जळतेय, पण त्यावर काही केंद्र सरकार बोलत नाही. पण बंगालमध्ये जरा काही झाले की भाजपवाले बोलतात, असा हल्ला त्यांनी चढवला.

चर्चा करायला सरकार तयार ः उपमुख्यमंत्री फडणवीस – खरंतर राजकीयच बोलायचे झाले, तर हे किती वर्षं होते सत्तेमध्ये? तेव्हा का नाही झाले? पण अशा गोष्टीत राजकीय बोलणे योग्य नसते. त्यामुळे या गोष्टीवर त्यांनीही राजकारण करू नये. फक्त एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होत नसते. इथले काही नियम आहेत. हे फक्त राजकारण चाललं आहे. असं राजकारण चालणार नाही. जर गांभीर्याने चर्चा करायची असेल, तर सरकार यावर निवेदन करेल. त्यात काही कमतरता असेल, तर चर्चा करायलाही सरकार तयार आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. सरकारच्या भूमिकेमुळे समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

COMMENTS