Homeताज्या बातम्या

आदिशक्ती संत मुक्ताई पालखी मार्गावरील अस्वच्छता व खड्डे तातडीने दुरुस्त करा!मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे डॉ. गणेश ढवळे यांची निवेदनाद्वारे मागणी

बीड : आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी उद्या बीड शहरात दाखल होत असून, पालखी मार्गावरील अस्वच्छता, कचर्‍याचे ढीग आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे

‘तेल की बचत, देश की ताकत!’; श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भव्य जनजागृती रॅली
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
व्यापाऱ्यांच्या प्रश्नी आ. विजयसिंह पंडित यांच्याकडून तात्काळ दखल; सुभाष रोडवरील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश


बीड : आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी उद्या बीड शहरात दाखल होत असून, पालखी मार्गावरील अस्वच्छता, कचर्‍याचे ढीग आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वारकरी व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पालखी मार्गाची तातडीने स्वच्छता करून रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड आणि जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी जालना रोडमार्गे बीड शहरात प्रवेश करते. त्यानंतर सुभाष रोड, माळवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक आणि जुना बाजार मार्गे पुढील प्रवास करते. बीडमध्ये संत मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट होत असल्याने या पालखी सोहळ्याला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम बीडमध्ये असतो. मात्र यंदा पालखी मार्गावर अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालखीच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आणि भाविक शहरात येत असल्याने या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी आगमनापूर्वी संपूर्ण मार्गाची स्वच्छता, खड्ड्यांची दुरुस्ती आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.
चौकट :
पालखीचा प्रमुख मार्ग जालना रोड फ सुभाष रोड फ माळवेस फ धोंडीपुरा फ बलभीम चौक फ जुना बाजार मार्गे आदिशक्ती संत मुक्ताई पालखी पुढील प्रवास करते. याच मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात कचरा व रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
चौकट :
डॉ. ढवळे यांची मागणी पालखी आगमनापूर्वी संपूर्ण मार्गाची विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, प्रकाशव्यवस्था आणि इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून वारकरी व भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

COMMENTS