Homeताज्या बातम्या

मतदारांनी एस.आय.आर. फॉर्म भरून लोकशाही अधिक सक्षम करावी – शेख फारुख

बीड : सध्या निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (डखठ) मोहिमेत सर्व पात्र मतदारांनी वेळेत आपला फॉर्म भरून आवश्यक काग

बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या घरभेटीने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा शुभारंभअचूक मतदार यादीसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
कामाचा ‘ताप’ अन पावसाची धारभर पावसात शिक्षक करतायेत ‘एसआयर’चे काम

बीड : सध्या निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (डखठ) मोहिमेत सर्व पात्र मतदारांनी वेळेत आपला फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी केले आहे.
शेख फारुख म्हणाले की, मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि भविष्यात मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
यावेळी शेख फारुख यांनी नागरिकांना आपल्या परिसरातील बीएलओ (इेेींह ङर्शींशश्र जषषळलशी) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह एस.आय.आर. फॉर्म तातडीने भरावा, असे आवाहन केले. तसेच समाजातील सर्व घटकांनी आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व शेजार्‍यांनाही या प्रक्रियेची माहिती देऊन जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी केले.

COMMENTS