Homeताज्या बातम्या

पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारकरुंची तारांबळ उडाली. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. परिसरातील काळकूप, माळकुप, जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ,भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून लांबलेल्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.  

पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात
‘मुळा’च्या अध्यक्षपदी मोटे, पाटील उपाध्यक्ष
लिंगायत हटगर कोष्टी समाजाचा सन्मान सोहळा

COMMENTS