Homeताज्या बातम्यासंपादकीय

आंदोलन, हल्ला आणि हिरोगिरी! 

मराठा आरक्षणाला कोणत्याही समाज प्रवर्गाचा स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही. परंतु, सध्या काही आंदोलकांनी ओबींसीं आरक्षणातून आरक्षण देण्याचा सात

लोकशाही सशक्त करावयाची असेल, तर…….!
नवनिर्माण न होणारे राजकीय अपयश ! 
वीज कर्मचारी संप आणि….. 

मराठा आरक्षणाला कोणत्याही समाज प्रवर्गाचा स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही. परंतु, सध्या काही आंदोलकांनी ओबींसीं आरक्षणातून आरक्षण देण्याचा सातत्याने हट्ट ़धरला आहे. अर्थात, भारतीय संविधान या देशातील कोणत्याही नागरिकाला आपले विचार स्वातंत्र्य देत असल्यामुळे आरक्षणावरच्या मागणी आणि मते नंदविण्याचा मराठा आंदोलक असणाऱ्यांना अधिकार आहे. एकमात्र खरे की, महाराष्ट्रात होणाऱ्या कोणत्याही आंदोलनामागे एक सामाजिक शक्ती लागते. मराठा आरक्षणासाठी मात्र, मराठा जात हीच सामाजिक शक्ती आहे. यातही आता दुफळी निर्माण होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःला कुणबी म्हणण्यास नकार दिला आहे. यामागे मराठा आंदोलनाचा जो दबाव सकारवर निर्माण होऊन ताण वाढत आहे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी नारायण राणे यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. याच दरम्यान आता मराठा आंदोलकांनी वकिलीची सनद निलंबित झालेले गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. या हिंसक कृत्याचे मराठा समाजाने आणि त्यातील उच्च शिक्षितांनी केलेले समर्थन सभ्य समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणे आहे. तोडफोड करणाऱ्यांचा खटला मोफत लढण्याची भाषा मराठा समाजातील वकिलांनी ताबडतोब घेणे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देणे आहे. या तोडफोडीत सरपंच सारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तिचा समावेश असणे, हे धक्कादायक आहे. त्यातच तो व्यक्ती अशा प्रकारच्या स्टंटबाज आंदोलने नेहमीच करित असल्याची माहिती आता समोर आली आहे. स्टंटबाज आंदोलने करणे हे जर हिरोगिरी चे लक्षण ठरत असेल तर मग याचा गित्ता गिरवायला तरूणांना वेळ लागणार नाही, याची दखल घेतली गेली पाहिजे. यावर कडी म्हणजे विधीमंडळातील एका सदस्याने ” गाडी फोडण्यापेक्षा ‘त्यालाच” संपवा असे थेट वक्तव्य केले. अर्थात, सध्याचा काळ कायदेशीर शैथिल्याचा काळ असल्याने असं सगळं चाललंय. दुसऱ्या बाजूला ज्या वकीलाच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला तो वकील वैचारिक पातळीवर अगदी वाह्यात आहे. या भारतात नथुराम गोडसे या महात्मा गांधीच्या मारेकऱ्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक देखील कचरतात. अशा गोडसे ची प्रतिमा घेऊन रॅली अथवा मोर्चा काढणारा वकील महाराष्ट्राच्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या भूमित निपजावा आणि ते देखील निव्वळ पैशांसाठी यापेक्षा निचतम पातळीची कोणतीही घटना आमच्या मते असू शकत नाही. अर्थात, यासर्व घडामोडी लिहीलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होत आहेत; याचा अर्थ यामागे समान धागा आहे. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आपल्या भाषणात किंवा सार्वजनिक चर्चेत नेहमी म्हणतात की, ज्या आंदोलनाला मिडिया सर्वाधिक कव्हरेज देते, ज्यात अचानक मोठ्या प्रमाणात माॅब येतो, अशी सर्व आंदोलने ही उजव्या शक्तींनी म्हणजे शक्ती दिलेली असतात. महाराष्ट्रात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर लोकांमध्ये चर्चा होऊ नये, किंबहुना जनतेचे लक्ष खाजगीकरण, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था अशा प्रश्नांवरून विचलित करावे, हे सत्ताधाऱ्यांसाठी आवश्यक सूत्र आहे. आयुष्य आंदोलन आणि राजकारणात खर्ची घातलेल्या नेत्यांच्या मागे जेवढा समुह उभा राहत नाही, त्याच्या दहापट समुह एका रात्रीत नेते म्हणून उदयास येणाऱ्यांच्या मागे कसा येतो, हे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन ज्ञान शाखांना अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, सध्याच्या काळात होणारे जरांगे-पाटील यांचे आंदोलन, ऍड. सदावर्ते चे गोडसे प्रेम आणि आणि झुंडशाही करणारे तरूण आणि राजकारणात या सर्व  बाबी आदर्श म्हणून उभे करू पाहणारे राजकीय नेते हे सर्व अभ्यासाचा विषय आहेत. 

COMMENTS