Homeताज्या बातम्या

चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या करण्यात येणार्‍या महाराष्ट्र कृषी दिनाचे औचि

महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
‘निळवंडे’च्या पाण्याने संजीवनी; आता आधुनिक शेती तंत्र स्वीकारा : शालिनी विखे
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या करण्यात येणार्‍या महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून चिंचाळा येथे भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृषी दिनाचे महत्त्व, सेंद्रिय शेती, शेतकर्‍यांचे आरोग्य आणि बदलत्या काळातील ग्रामीण जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचाळा गावचे सरपंच पंडित कल्याण पोकळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, शेतकरी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात सकाळी आणि संध्याकाळी गावातील शेतकरी एकत्र येऊन शेतीविषयक तसेच सामाजिक विषयांवर चर्चा करत असत. त्यामुळे गावातील एकोपा आणि परस्पर संवाद टिकून राहत होता. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक अवलंब केला पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी आवश्यक असणारी फळे आणि भाजीपाला शक्यतो स्वतःच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्याचे सेवन केले पाहिजे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला आरोग्यासाठी उपयुक्त असून त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सरपंच पंडित कल्याण पोकळे यांनी कृषी महाविद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कृषी महाविद्यालयाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांना चिंचाळा गावात वास्तव्यास पाठवून गावातील शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.
यापुढील काळातही कृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात शेतकर्‍यांसाठी विविध कृषीविषयक कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित शेतकरी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे आभार मानून कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राधाकिसन पोकळे,  नवनाथ महाराज पोकळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पोकळे, जि. प . शाळा चे मुखाध्यापक दिपक मस्के, दादासाहेब चव्हाण सर, स्वाती खिलारे मॅडम,बबन पोकळे चेअरमन, देविदास पोकळे, कांतीलाल पोकळे, डॉ. जानदेव साळुंके, संतोष पोकळे, गहीनाथ पोकळे, मधुकर पोकळे , परसराम पोकळे, कृष्णा तांबे, कृष्णा पोकळे, पंढरीनाथ पोकळे, दिगंबर पोकळे,विजय पोकळे, बबन पोकळे, गणेश काकासाहेब पोकळे, पोलीस पाटील तात्यासाहेब पोकळे,  अनिल पोकळे, दीपक साळुंके, अमृत पोकळे, डॉ. अशोक पोकळे, गणेश पोकळे, संदीप पोकळे,  प्रदीप पोकळे, बाळासाहेब पोकळे, बाबू भवर,अशोक पोकळे, पांडुरंग पोकळे,सागर पोकळे,लक्ष्मण पोकळे , अविनाश पोकळे,भाऊसाहेब रावसाहेब पोकळे, भाऊसाहेब गोरख पोकळे, कंकालेश्वर पोकळे, धनंजय पोकळे,अविनाश प्रभाकर पोकळे,  महेश पोकळे,प्रतीक तोडकर , चंद्रकांत पोकळे यांच्यासह गावातील शेतकरी, ग्रामस्थ, उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण मिसाळ यांनी केले. कृषी महाविद्यालयाचे विषय तज्ञ प्रा.सुजाता बनकर,  प्रा.पोपट काळे, प्रा. सागरदेसाई पाटील, प्रा. गोकुळ नवसारे, कार्यक्रमाधिकारी प्रा.रोहिणी शिंदे हे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन कृषिकन्या इनपा मनीषा ,घुले प्रांजल ,रहाडे काजल, ससाने वैष्णवी ,थल्ला पावनी, थिटे संस्कृती यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धन व शेतीविषयक जागरूकतेचा संदेश दिला.

COMMENTS