Homeताज्या बातम्या

कोरो इंडिया समता फेलोच्या पुढाकारातून ‘हम भारत के लोग’ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा

बीड : कोरो इंडिया समता फेलो च्या वतीने तसेच शेर-ए-हिंद बहु उद्देशिय सेवाभावी संस्था,नेकनूर ता.जि.बीड यांच्या सहकार्याने ’हम भारत के लोग ’या विषया

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा


बीड : कोरो इंडिया समता फेलो च्या वतीने तसेच शेर-ए-हिंद बहु उद्देशिय सेवाभावी संस्था,नेकनूर ता.जि.बीड यांच्या सहकार्याने ’हम भारत के लोग ’या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन रविवार,दि.05 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात आले.ही कार्यशाळा बीड येथील खान कोचिंग क्लासेस,राष्ट्रवादी भवनाच्या पाठीमागे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे आयोजन शेख आमेर गफ्फार (आमेर पाशा) यांनी केले. ते कोरो इंडिया समता फेलो असून शेर-ए-हिंद बहु उद्देशिय सेवाभावी संस्था,नेकनूरचे संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांच्या पुढाकारातून संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये भारतीय संविधानाची निर्मिती,संविधानाची उद्देशिका,मूलभूत अधिकार,मूलभूत कर्तव्ये,राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक न्याय, समानता,बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये तसेच संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी येवला नाशिक येथुन समता फेलो तथा संविधान प्रचारक अज़हर शाह सर यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संविधानाची मूलतत्त्वे समजून घेत लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित मार्गदर्शकांनी भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता प्रदान करणारे सर्वोच्च दस्तऐवज असल्याचे सांगत संविधानाचे अध्ययन आणि पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.तसेच संविधानातील मूल्यांचा समाजात प्रसार होण्यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुक्मिण ताई नागापुरे (कोरो इंडिया),श्रद्धाताई बंडगर (कोरो इंडिया ) हे होते.या वेळी डॉ.सय्यद मजहरोद्दिन फिजिओथेरपिस्ट, शेख वजीर भाई,हनीफ पठाण,डॉ.फजल रहेमान,हाश्मखाँ पठाण,सा.आरोळीवार्ताचे संपादक विनोद शिंदे,आशा ढोले मॅडम,विजया गायकवाड मॅडम,शेख नफीस,शेख जाकेर हुसेन,शेख अली भाई,बाजीराव ढाकणे,साबेर भाई उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान सहभागींसोबत प्रश्नोत्तरांचे सत्र, समूहचर्चा आणि संविधानावरील विविध विषयांवर संवाद करण्यात आला.यामुळे उपस्थितांना संविधानाची अधिक सखोल माहिती मिळाली आणि लोकशाही व्यवस्थेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक शेख आमेर गफ्फार (आमेर पाशा),शेर-ए-हिंद बहु उद्देशिय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच सर्व सहभागी यांचे आभार मानण्यात आले. उपस्थितांनी अशा संविधान जनजागृती उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.उपस्थितांनी अशा संविधान जनजागृती उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक रुक्मिणी नागापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले तसेच आभार श्रद्धाताई बडगर यांनी मानले.

COMMENTS