श्रीगोंदा : श्रीगोंदा विकास सेवा सोसायटीच्या व्यवस्थापक समितीची मासिक सभा शुक्रवारी (दि. ३) संस्थेचे अध्यक्ष सुनील शिवराम बोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेच्या सभासदांमधून प्रतिनिधीची निवड हा महत्त्वाचा विषय होता.या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संस्थेच्या माजी उपाध्यक्ष मंदाकिनी सूर्यकांत वडवकर यांचे ७ जून रोजी सर्पदंशामुळे झालेले अकाली निधन लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे पती सूर्यकांत विठ्ठल वडवकर यांचे नाव जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदासाठी सुचविण्यात आले.ही सूचना माजी उपाध्यक्ष मोहन हरिभाऊ डांगरे यांनी मांडली, तर सुभाष विठ्ठलराव बोरूडे यांनी त्यास अनुमोदन दिले. या निर्णयापूर्वी सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.सभेला संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अशोकराव आळेकर, बापुराव सिदनकर, भिमराव आनंदकर, पोपट कोथिंबीरे, उपाध्यक्ष हनुमंत उदमले, माजी उपाध्यक्ष मोहनराव डांगरे, सखाराम औटी, संचालक अनिल नन्नवरे, ज्योती हेमंत खेतमाळीस तसेच ज्येष्ठ सभासद व माजी चेअरमन पोपटराव बोरूडे, कालिदास खेतमाळीस, जगन्नाथ औटी यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.दिवंगत संचालिकेच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशीलता दाखवत घेतलेल्या या निर्णयाचे सभासदांसह विविध स्तरांतून स्वागत होत असून, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे हे उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.याप्रसंगी राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा विकास सेवा सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाचे आणि सभासदांचे अभिनंदन करत, संस्थेने एकमताने घेतलेला हा निर्णय सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी पुढील काळातही संस्थेने सभासदांच्या हिताला प्राधान्य देत अशीच लोकाभिमुख परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

COMMENTS