Homeताज्या बातम्या

पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृहाची दुरावस्थावन विभागाच्या पर्यटन संकल्पनेलाच तडा !

शेवगाव : शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तीन वर्षांनंतर पुन्हा उद्घाटन झाल्यानंतर येथील विविध त्रुटी आणि दुरावस्था

बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
शेवगाव पोलिसात यापुढे खोटे गुन्हे दाखल होणार नाही – मोहन बोरसे ( पोलीस निरीक्षक )
माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

शेवगाव : शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तीन वर्षांनंतर पुन्हा उद्घाटन झाल्यानंतर येथील विविध त्रुटी आणि दुरावस्था एकामागोमाग समोर येत आहेत. वन विभागाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, वन्यजीव व पक्ष्यांविषयी जनजागृती आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे पर्यटन केंद्र उभारले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि कथित हलगर्जी कारभारामुळे या उद्दिष्टांनाच हरताळ फासला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.या पर्यटन केंद्रात विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास जपण्याबरोबरच पर्यटकांना निसर्गाचा जवळून अनुभव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी, असा शासनाचा हेतू होता. मात्र प्रत्यक्षात केंद्रातील सुविधांची झालेली दुरवस्था पाहता हे सर्व उद्दिष्टच अपूर्ण राहिल्याचे चित्र दिसत आहे.यापूर्वी पर्यटन केंद्रातील जळालेली झाडे, चोरीस गेलेले दिवे, सौर ऊर्जा यंत्रणेची झालेली नासधूस आणि इतर अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांवर पाण्याच्या टाक्याच बसविण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुविधांचा उपयोगच होत नसल्याचा आरोप होत आहे.याबाबत संबंधित ठेकेदार पंकज हाके यांच्याशी संपर्क साधला असता, “याबाबत मला काही आठवत नाही,” असे उत्तर त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.वन पर्यटन केंद्र हे पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आले होते. मात्र मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने शासनाच्या उद्दिष्टांनाच धक्का बसल्याची प्रतिक्रिया पर्यटक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.वन पर्यटन केंद्रातील कथित अनियमितता व दुरवस्थेची शासनस्तरावर तातडीने चौकशी करण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारेल. –  बाळासाहेब फटांगडे, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना.माहिती घेऊन सांगतो : वनसंरक्षक हिरे (नाशिक डिव्हिजन)यासंदर्भात नाशिक डिव्हिजनचे वन विभागाचे वनसंरक्षक (सीएफ) गजेंद्र हिरे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी या संदर्भात आपल्याला अद्याप पर्यंत काहीही माहिती आलेली नाही; माहिती घेऊन काय ते बोलतो असे ते म्हणाले.

COMMENTS