Homeताज्या बातम्या

माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

देवळाली प्रवरा : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यातूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
फक्राबाद दरोड्यातील आरोपी जेरबंद
पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण


देवळाली प्रवरा : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यातूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख तथा राहुरी तालुक्यात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले रावसाहेब खेवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
 जिल्हाप्रमुखपदावरून हटविल्यानंतर पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले खेवरे अखेर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेसोबत गेले. राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि संघटन कौशल्य लक्षात घेता हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 ठाणे येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेवरे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडधे, रामहरी सिकंडे, अनिल बांगरे, मच्छिंद्र धुमाळ, सोमनाथ गोरे, सुनील शेलार, संजय म्हसे, पोपट शिरसाठ, हरिभाऊ शेळके, राजूभाऊ झावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशासाठी शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेवरे यांच्या पक्षांतरामुळे राहुरी तालुक्यातील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS