Homeताज्या बातम्या

लग्नाच्या आमिषाने युवतीची 13 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर : लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आ

भुईकोट किल्ल्यावर ‘योग संगम’१७ महाराष्ट्र बटालियनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
मळगंगा देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ;शेकडो महिलांची उपस्थिती;  भक्तिमय वातावरणात जल्लोष
सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचाच दशक्रिया विधी का केला? अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयत्न
Identity fraud on matrimonial sites | marathi news

अहिल्यानगर : लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी दादाराव रामोजी भांगे (वय 29, रा. आवलगांव, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जून 2021 ते जून 2026 या पाच वर्षांच्या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. या काळात त्याने शिर्डी येथील एस. एस. पॅलेस हॉटेलवर महिलेशी वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेकडून टप्प्याटप्प्याने 13 लाख रुपये रोख आणि तीन तोळे सोने उकळले. मात्र, इतका काळ उलटूनही आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली आणि घेतलेले पैसे व सोने परत देण्यास नकार दिला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करत आहेत.

COMMENTS