शिर्डी : श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले. तामिळनाडूतील चेन्नई येथील साईभक्त जी. लक्ष्मी कांता यांनी साईचरणी सुमारे १३ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुवर्णमुलामा दिलेला शंख अर्पण केला.देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येत असून, श्रद्धेपोटी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करतात. त्याच परंपरेत जी. लक्ष्मी कांता यांनी सुमारे १०० ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्णमुलामा दिलेला शंख श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केला.या शंखाची बाजारपेठेतील किंमत सुमारे १३ लाख २७ हजार ९०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते जी. लक्ष्मी कांता यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या अनोख्या देणगीची शिर्डीत चर्चा सुरू आहे.जी लक्ष्मी कांता यांनी सांगितलं, “साईबाबांवर गेल्या तीन दशकांपासून अखंड श्रद्धा आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ सुरू असताना मला साईबाबांचं बोलावणं आलं. तेव्हापासून मी दरवर्षी न चुकता शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेते. साईबाबांवरील निस्सीम श्रद्धेपोटी मी दरवर्षी सलग 108 दिवस पायात चप्पल न घालता कडक व्रत पाळते. साईबाबा प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्याला मार्गदर्शन करतात. अगदी स्वप्नात येऊनही योग्य-अयोग्याची जाणीव करून देतात, असा माझा ठाम विश्वास आहे. साईबाबांच्या इच्छेशिवाय आपल्या आयुष्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय मी घेत नाही. साईबाबांकडून मिळालेल्या कृपेनंच मी आनंदी राहून गरजू लोकांना मदत करू शकते. मी अर्पण केलेला सुवर्ण शंख हे केवळ मौल्यवान दान नसून साईबाबांप्रती असलेल्या अथांग भक्तीचं प्रतीक आहे, असं मी मानते.”

COMMENTS