Homeताज्या बातम्या

‘शक्तीसॅट’ आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी भक्तीची निवड

देवळाली प्रवरा : रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भक्ती संतोष राकेचा हिची प्रतिष्ठित ‘शक्तीसॅट’ उपग्रह प्रकल्पाच्या आठ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून झालेल्या या निवडीमुळे शाळेसह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रक्षेपित होणाऱ्या ‘शक्तीसॅट’ उपग्रह प्रकल्पाच्या अनुषंगाने २३ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथे आठ दिवसांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जगातील १०८ देशांतील विद्यार्थिनींसह भारतातील २८ राज्यांमधून निवडलेल्या अवघ्या २० विद्यार्थिनी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या मानाच्या कार्यशाळेसाठी न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार बु. येथील भक्ती राकेचा हिची महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या हस्ते भक्तीचा सत्कार करण्यात आला.  भक्ती राकेचा ही देवळाली प्रवरा येथील सुप्रसिद्ध व्यापारी अमृतलाल देसर्डा यांची नात तसेच आशिष देसर्डा यांची भाची आहे. 

शेवगाव पोलिसात यापुढे खोटे गुन्हे दाखल होणार नाही – मोहन बोरसे ( पोलीस निरीक्षक )
उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
संजीवनी शैक्षणिक संकुलात वटपौर्णिमा उत्साहात

देवळाली प्रवरा : रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भक्ती संतोष राकेचा हिची प्रतिष्ठित ‘शक्तीसॅट’ उपग्रह प्रकल्पाच्या आठ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून झालेल्या या निवडीमुळे शाळेसह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात प्रक्षेपित होणाऱ्या ‘शक्तीसॅट’ उपग्रह प्रकल्पाच्या अनुषंगाने २३ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथे आठ दिवसांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जगातील १०८ देशांतील विद्यार्थिनींसह भारतातील २८ राज्यांमधून निवडलेल्या अवघ्या २० विद्यार्थिनी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या मानाच्या कार्यशाळेसाठी न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार बु. येथील भक्ती राकेचा हिची महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र पाटील खर्डे यांच्या हस्ते भक्तीचा सत्कार करण्यात आला.  भक्ती राकेचा ही देवळाली प्रवरा येथील सुप्रसिद्ध व्यापारी अमृतलाल देसर्डा यांची नात तसेच आशिष देसर्डा यांची भाची आहे. 

COMMENTS