Homeव्हिडीओ

आषाढी वारीला जाण्यासाठी वैष्णवांचा मेळा झाला सज्ज

https://youtu.be/nzA6pRQaKYs शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत श्रीराम महाराज झिंजुर्के यांनी स्वतःच्या संस्थांनचं कार्

ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
महाराष्ट्र दिनानिमित्त महिनाभर मोफत नेत्रतपासणी; स्वस्तिक हॉस्पिटलचा उपक्रम; उत्स्फूर्त प्रतिसाद
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 

शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत श्रीराम महाराज झिंजुर्के यांनी स्वतःच्या संस्थांनचं कार्य या व्यतिरिक्त स्वतःची कीर्तन हे सर्व बाजूला ठेवून गावोगावी जाऊन सांप्रदायांमध्ये टाळकरी , भजनी तयार व्हावेत यासाठी महाराजांनी गावोगावी जाऊन प्रथमतः हे कार्य सुरू केले फक्त गुरुवर्य झिंजुर्के महाराजांची तळमळ आहे ‘ महाराष्ट्रात हे कार्य कोणीही अद्याप पर्यंत केले नाही ,प्रत्येक महाराजाला आपल्या प्रॉपर्टी वाढीसाठी तळमळ आहे परंतु टाळकरी भजनी घडवण्यासाठी नसल्याची खंत राजाराम महाराज काटे यांनी व्यक्त केली .
आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा सज्ज झाला असल्याने शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील भिमसिंह महाराज भक्ती पिठातील पन्नास ते साठ तरुणांना महंत राम महाराज झिंजुर्के यांचे शिष्य राजाराम महाराज काटे यांनी गेल्या दहा दिवसापासून पंढरपूरच्या पायी वारीसाठी दिंडीमध्ये म्हणण्यासाठी फडकरी पद्धतीच्या अभंग गायणाच्या चाली चे प्रशिक्षण विनामूल्य दिले , नुकत्याच झालेल्या गोपाल कृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवात झिंजुर्के महाराजांनी शंभराहून अधिक तरुण भाविकांना टाळकरी घडविल्याने त्यांना आता आषाढी वारीसाठी फडकरी अभंग गायनाचे प्रशिक्षणही देण्यात आले

COMMENTS