Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोहा- कंधार मतदारसंघातील घराणेशाही थांबविण्यासाठी एकनाथ दादा पवार यांना विधानसभेत पाठवा 

दत्ताभाऊ शेंबाळे यांंचे जाहीर आव्हान

लोहा प्रतिनिधी - लोहा - कंधार मतदारसंघात गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांना संतरज्या उचलायला लावून मी, माझा मुलगा-मुलगी, बहीण, सून ,जावइ आ

सलमान खान च्या फॅन्सनी सिनेमागृहात फटाके फोडत ‘टायगर 3’चे केले स्वागत
 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 
वडिलांची जबाबदारी स्वीकारत गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय

लोहा प्रतिनिधी – लोहा – कंधार मतदारसंघात गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांना संतरज्या उचलायला लावून मी, माझा मुलगा-मुलगी, बहीण, सून ,जावइ आणि माझेच नातेवाईक दाजी भावजींच्या या घराणेशाही वृत्तीतून होत आलेल्या राजकीय वाटचालीला प्रतिबंध घालायचे असेल तर एकनाथ दादा पवार यांचा राजकीय वारसदार फक्त आणि फक्त कार्यकर्ताच असल्याने त्यांनाच विधानसभेत पाठवण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे यांनी केले.
सूर्योदय मन्याड फाऊंडेशनचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढविण्याचा नव्हे तर जिंकण्याचा संकल्प केला असून सतत गत चार वर्षांपासून लोह- कंधार विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावातील, वाडी- तांड्यातील मतदार, जनता, युवक,वयोवृद्ध, तसेच विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने  स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. एकनाथ दादा पवार म्हणतात, लोहा-कंधार विधानसभेची निवडणूक मला जनतेसाठी जिंकायची आहे. चाळीस वर्षात या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही याचे कारण म्हणजे इच्छा शक्तीचा अभाव व फक्त मी व माझे कुटुंब हेच आहे. निवडणूक कोणतीही असो फक्त मी व माझेच कुटुंब. काही दिवसांपूर्वी कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी…! त्यांच्या या आदेशाचे  तंतोतंत पालन करण्यात लोहा-कंधार विधानसभा मतदार संघातील राजकीय पुढारी कुठेही कमी पडले नाहीत. माझंच पोरगं, माझीच पोरगी.माझीच बहीण. माझाच दाजी,.माझाचं पुतण्या. माझाचं जावई. माझीच सूनं हेच घसा कोरडा पडे पर्यंत म्हटले जात आहे. काही लोकांनी तर नातवांची पण जोड लावून ठेवली, माझेच नातेवाईक, माझचं कुटुंब याला मात्र आता या विधानसभा मतदारसंघातील जनता वैतागली असून ’अबकी बार, एकनाथ दादा पवार….!’ हा संकल्प स्वतः हून जनतेनेच केला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसापूर्वी फुलवळ येथील महादेव मंदिर येथे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा मेळावा भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता शेंबाळे यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यास आवाहन करतांना दत्ता शेंबाळे म्हणाले की, कार्यकर्त्यांना राजकारणात संधी हवी असेल तर त्यांनी भक्कमपणे या वेळेस एकनाथ दादा पवार यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत उभे रहा असे आवाहन दत्ता शेंबाळे यांनी केल. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार एकनाथ दादा पवार हे होते,दत्ता शेंबाळे पुढे म्हणाले की, मागच्या तीस वर्षांपासून या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा वापर फक्त कढी पत्यांसारखा निवडणुकी पुरताच करण्यात आला आहे, संधी द्यायची वेळ आली की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या मतदारसंघात एकही कार्यकर्त्यांला मिळाला नाही.असे न्याय मिळालेले कार्यकर्ते दाखवा, कोणत्याही पक्षात पहा,’गम के मारे’ कार्यकर्ते व युवकांमधे नैराश्य दिसत आहे. मी,एकनाथ दादा पवार यांच्या विषयी,त्यांच्या विकास काम करण्यासाठीच्या कार्यपद्धतीला अतिशय जवळ जाऊन पाहिले आहे. तुम्ही पण पाहा. अनुभव घ्या. खात्री करा. व एकनाथ दादा पवार यांचे काम करा. कारण,  पवार यांचा कोणीही राजकीय वारसदार नाही, दादाच म्हणतात, माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ताच असेल. याची गांभीर्याने नोंद घ्या. व एकनाथ दादा पवार यांनाच आमदार करा. कारण 1995 ला परिवर्तनाची पहिली बैठक मी या फुलवळच्या जागृत महादेव मंदिरात घेतली होती. आणि कंधार विधानसभा मतदार संघात कायापालट झाला होता.  या महत्त्वपूर्ण मेळाव्याला पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

COMMENTS