Homeताज्या बातम्या

म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिव

प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात पदवीदान समारंभ व माजी विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात
निवेदक महादेव इनकर यांना राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार जाहीर
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा



बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिवरसिगा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिरूरचे तहसीलदार सुरेश घोळवे आणि पोलीस निरीक्षक राजेश गोडवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्ञानदेव सानप, विश्वाभर शिंदे, नवनाथ बडे, माऊली शिंदे, भीमराव सानप, अलीम शेख, रामेश्वर पांडुळे, अनिकेत सानप यांच्यासह शिवश्री कृषी मंडळाचे अध्यक्ष शिवराम राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने 19 जुलै 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करून गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद, शेतजमिनीचे तंटे, शेतरस्ते, अतिक्रमण, भावकीतील वाद, व्यसनमुक्ती, दारूबंदी, जातीय व धार्मिक वाद आदी प्रश्न गावातच सामोपचाराने सोडविण्याची प्रभावी व्यवस्था निर्माण केली होती. या मोहिमेमुळे अनेक वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यापूर्वीच मिटत होते. उत्कृष्ट काम करणार्‍या गावांना शासनाकडून पुरस्कारही दिले जात होते. मात्र 2015 नंतर या मोहिमेकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने गावपातळीवरील तंटामुक्त समित्या निष्क्रिय झाल्या. परिणामी सामाजिक सलोखा बिघडत असून गुन्हेगारी, खून, दरोडे, अवैध धंदे आणि सोशल मीडियावरील बिनबुडाचे आरोप-प्रत्यारोप यामुळे समाजात द्वेष, सूडभावना आणि वैमनस्य वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक निवडणुकांमधील वैर, राजकीय महत्त्वाकांक्षा, सोशल मीडियाचा गैरवापर आणि जबाबदारीच्या भावनेचा अभाव यामुळे पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून बीड जिल्ह्याची प्रतिमाही राज्यभर मलिन होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.  गावातील वाद-विवाद गावातच सामोपचाराने सोडवून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तातडीने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पालकमंत्री, सर्व आमदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवश्री कृषी मंडळाचे अध्यक्ष शिवराम राऊत यांनी दिली.

COMMENTS