सोनई : सोनई व परिसरात शुक्रवारी (दि. ३) झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने ओढ
सोनई : सोनई व परिसरात शुक्रवारी (दि. ३) झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या या पावसाने मोठा दिलासा मिळाला असून, खरीप हंगामासह आडसाली ऊस लागवडीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. परिसरातील बारा वाड्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरणीची लगबग सुरू केली असून, विशेषतः कपाशी पिकासाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुरेशा ओलाव्यामुळे पिकांची उगवण चांगली होईल आणि खरीप हंगाम यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आगामी काही दिवसांतही पावसाची साथ कायम राहिल्यास आडसाली ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा मान्सून अनुकूल राहिल्यास सोनईसह संपूर्ण नेवासा तालुक्यात खरीप हंगाम आणि ऊस उत्पादन दोन्हीही विक्रमी होण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

COMMENTS