निघोज : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर , पारनेर ग्रामीण पतसंस्था व बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पारन

निघोज : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर , पारनेर ग्रामीण पतसंस्था व बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथे सॉ. गुलाबराव शेळके सभागृहात रक्तदान शिबीर उत्सहात पार पडले.या रक्तदान शिबिराच्या दरम्यान गणेश औटी, सहाय्यक निबंधक नगर, विशाल दाते सहाय्यक निबंधक पारनेर, राजेंद्र वाघमोडे सहाय्यक अधिकारी, बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, निघोज पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके, पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक थोरात, किसान पतसंस्थेचे चंद्रकांत चेडे, माजी नगराध्यक्ष नितिन अडसूळ, निघोज पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब लामखडे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मर्ढीकर, बुचुडे सर, संस्थेचे उपव्यवस्थक सुरकुंडे, वरीष्ठ अधिकारी सुनील तांबे, सहाय्यक निबंधक पारनेर अधिकारी, सहाय्यक वर्ग, बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था व पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि पारनेर तालुक्यातील अनेक पतसंस्थेच्या अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान करून सहभाग घेतला. सूत्रसंचालन दत्तात्रय हांडे यांनी केले .

COMMENTS