Homeताज्या बातम्या

वारीपूर्वी इंद्रायणी नदी प्रदूषित नाना पटोले विधानसभेत आक्रमक

मुंबई : आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात सापडल्य

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरीवरून हल्ला
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवीबाळासाहेब थोरात : शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध
वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
मी राजीनामा द्यायला तयार', मारकडवाडी गावात जावून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Congress leader nana patole said i am ready for resignation and election on ballot paper ...


मुंबई : आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात सापडल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. नदीपात्रात पांढर्‍या फेसाचे थर साचल्याने भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे आमदार छरपर झरीेंश्रश यांनी सरकारकडे कठोर प्रश्‍न उपस्थित केले.
संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी देहू आणि आळंदी येथे दाखल होत आहेत. परंपरेनुसार अनेक भाविक इंद्रायणी नदीत स्नान करून तिचे पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करतात. मात्र, नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर फेस साचल्याचे चित्र समोर आल्याने वारकर्‍यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून औद्योगिक आणि रासायनिक मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विधानसभेत बोलताना नाना पटोले यांनी ‘नमामि इंद्रायणी’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आल्याचा उल्लेख करत, त्यानंतरही नदीची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. औद्योगिक आस्थापना, औद्योगिक वसाहती आणि गृहनिर्माण प्रकल्पांकडून आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणत्या तातडीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत? नदीत रासायनिक सांडपाणी सोडणार्‍या उद्योग आणि संबंधित संस्थांवर कोणती कठोर कारवाई केली जाणार आहे? आषाढी वारीसाठी येणार्‍या लाखो वारकर्‍यांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची नेमकी कार्ययोजना काय आहे? असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.

COMMENTS