पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणार्या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणार्या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही घटना घडली. दरडीसोबत माती, मोठे दगड आणि झाडेझुडपांचा राडारोडा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

COMMENTS