बीड : पंचायत समिती पाटोदा येथील शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. ऋषिकेश जर्नाधन शेळके यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब

बीड : पंचायत समिती पाटोदा येथील शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. ऋषिकेश जर्नाधन शेळके यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) अंतर्गत अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), जिल्हा परिषद परभणी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
श्री. शेळके यांनी बीड जिल्ह्यात मागील 25 वर्षांपासून शिक्षण विभागात विविध जबाबदार्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. प्रभारी गट शिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय कार्य केले. शासनाने निवडलेल्या आकांक्षी तालुक्यांमध्ये त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. जिल्हा तांत्रिक सेवा संवर्गातील विस्तार अधिकारी पदावरून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्त पदांसाठी झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ते पात्र ठरले असून, त्यांची अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), जिल्हा परिषद परभणी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS