शेवगाव : तालुक्यातील मठाचीवाडी येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सोन्याचे दागिने, दीड लाख रुपयांची रोकड तसेच पँटच्या खिशातील रोख रक्कमही चोरट्याने चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मठाचीवाडी येथील संदीप एकनाथ ठोंबळ (वय ३५) हे सोमवारी दिवसभर शेतात काम करून रात्री घरी आले होते. जेवणानंतर उकाड्यामुळे ते घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. घरात त्यांची आई, पत्नी आणि मुले झोपली होती. उष्णतेमुळे घराचा मुख्य दरवाजा अर्धवट लोटलेला असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.मंगळवारी पहाटे संदीप ठोंबळ यांची मुलगी पायल हिला जाग आल्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडे असल्याचे दिसले. तिने वडिलांना उठविल्यानंतर घरातील सर्वांनी पाहणी केली असता कपाटातील सामानाची उचकापाचक झाल्याचे आढळले. कपाटाची चावी दिवाणावरील गादीवर पडलेली होती. चोरट्याने चावीच्या साहाय्याने कपाट उघडून त्यातील ऐवज लंपास केला.चोरीमध्ये साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, साखळी व पदक, १८ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, कानातील दागिने, अंगठी, डोरले आदी सोन्याचे दागिने, तसेच कपाटातील दीड लाख रुपयांची रोकड असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याशिवाय संदीप ठोंबळ यांच्या पँटच्या खिशात ठेवलेली रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली.घटनेची माहिती मिळताच संदीप ठोंबळ यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार परशुराम नाकाडे पुढील तपास करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात तपासमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

COMMENTS